5 जुलै दिवशी मुंबईमध्ये विजयी मेळाव्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पुन्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) 65 वा वाढदिवस आहे. राज ठाकरेंसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर मातोश्री वर दाखल झाले होते. 20-25 मिनिटं राज ठाकरे 'मातोश्री' वर होते. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींनाही वंदन केले.  मातोश्री बाहेरील स्टेजवर ठाकरे बंधूंसोबत अंबादास दानवे, संजय राऊत देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)