
IND vs AUS 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय संघात पुनरागमन केले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फेब्रुवारीमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर हे दोन्ही दिग्गज पहिल्यांदाच वनडे क्रिकेट खेळत होते. इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित आणि विराटने वनडे खेळणे कायम ठेवले आहे. मात्र, दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहिल्यामुळे त्यांच्या फॉर्म आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह होते. दोघेही फिट दिसत होते, पण बॅटने ते फार मोठी छाप पाडू शकले नाहीत, ज्यामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला.
रोहित शर्माचा फॉर्म हरवला
रोहित शर्माने एक सुंदर कव्हर ड्राईव्ह मारला, पण नेहमीचा आत्मविश्वास आणि फ्लो त्याच्या फलंदाजीत दिसला नाही. जॉश हेझलवूडने टाकलेला एक उत्कृष्ट चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन आला आणि त्याने रोहितच्या बॅटची कड घेतली, ज्यामुळे तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. दीर्घकाळ खेळातून बाहेर राहिल्यानंतर असे होणे साहजिक आहे. मालिकेतील पहिला सामना खेळल्यामुळे तो पुढील सामन्यात आपला फॉर्म लवकरच परत मिळवेल, अशी अपेक्षा आहे.
Rohit Sharma out 💔💔💔💔💔
Josh Hazlewood strikes #RohitSharma𓃵 #INDvsAUS #AUSvIND pic.twitter.com/z3iGoCeeFQ
— Megha (मेघा) 🇮🇳 (@Megha212927) October 19, 2025
विराट शुन्यावर बाद
विराट कोहलीही ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे तो खूप निराश झाला असेल. त्याने मिचेल स्टार्कच्या वाईड चेंड्याचा पाठलाग केला, ज्यामुळे चेंडूने बॅटची कड घेतली आणि थेट पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. वाईड चेंडूचा पाठलाग करणे ही विराटच्या फलंदाजीतील दीर्घकाळ चाललेली समस्या आहे. त्याने ड्राईव्ह मारून खूप धावा केल्या आहेत, पण खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळी घेत असताना असा शॉट खेळणे योग्य नव्हते.
VIRAT KOHLI GONE FOR A DUCK!#AUSvIND pic.twitter.com/cg9GbcMRAE
— cricket.com.au (@cricketcomau) October 19, 2025
पुढील सामने रोहित-विराटसाठी महत्त्वाचे
रोहित आणि कोहली हे विश्वचषक २०२७ मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, पण मालिकेतील त्यांच्या कामगिरीवर खूप काही अवलंबून असेल. जर ते या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, तर या मालिकेनंतर त्यांचे वनडे करिअर संपुष्टात येऊ शकते. या दिग्गजांनी उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून, ते अजूनही संघासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे सिद्ध करण्याची गरज आहे. त्यांची कामगिरी भारतीय संघासाठी पुढील काळात अत्यंत निर्णायक ठरणार आहे.