Mohammed Shami: जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्याने मोहम्मद शमीला मोठी संधी, विश्वचषकापूर्वी T20 संघात होवू शकते पुनरागमन
Mohammad Shami (Photo Credit - Twitter)

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) गेल्या वर्षी T20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये संधी देण्यात आली नाही आणि तो संघाबाहेर राहिला. त्याचवेळी, रिपोर्टनुसार, निवडकर्त्यांनी शमीला भविष्यात पुन्हा टी-20 (T20) साठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असेही सांगितले होते. अशा स्थितीत भारतासाठी 17 टी-20 सामने खेळणाऱ्या मोहम्मद शमीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधील कारकिर्दीचा शेवट केला असे मानले जात होते. पण शमीच्या बाबतीत निवडकर्त्यांनी यू-टर्न घेण्याचा निर्णय घेतला असून तो लवकरच टी-20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसू शकतो.

संघात होवू शकते पुनरागमन

भारताचे दोन प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे आशिया चषक 2022 च्या आधी दुखापतग्रस्त झाले आहेत आणि त्यांच्या विश्वचषकात खेळण्याबाबतही शंका आहे, त्यामुळे निवडकर्ते शमीला संघात परत आणण्याचा विचार करत आहेत. जर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल वेळेत तंदुरुस्त झाले नाहीत तर, मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत तसेच विश्वचषकात गोलंदाजीचे नेतृत्व करू शकेल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या होम सीरिजमध्ये शमीचा समावेश होण्याची शक्यता आहे. (हे देखील वाचा: Asia Cup 2022: आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी शाकिब अल हसनची कर्णधारपदी निवड, स्पर्धेसाठी 17 जणांचा संघ जाहीर)

शमीला इतर खेळाडूंपेक्षा परिस्थिती चांगल्या प्रकारे समजते

निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले होते की, “पाहा, शमी आता तरुण नाही आणि त्यामुळे आम्हाला त्याच्या कामाचा ताणही सांभाळावा लागेल. म्हणूनच त्याला T20 बद्दल माहिती देण्यात आली (निवड होणार नाही). पण आमचे दोन आघाडीचे वेगवान गोलंदाज दुखापत झाल्यास, आम्हाला ऑस्ट्रेलियातील विश्वासार्ह व्यक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. शमीला इतर खेळाडूंपेक्षा परिस्थिती चांगल्या प्रकारे समजते आणि त्याचा आम्हाला उपयोग होऊ शकतो. त्याबाबतचा अंतिम निर्णय नंतरच घेतला जाईल.