Shubman Gill (Photo Credit- X)

Shubman Gill: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी (२३ ऑक्टोबर) भारतीय कर्णधार शुभमन गिलचा (Shubman Gill) एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका पाकिस्तानी चाहत्याने गिलसोबत गैरवर्तन केले. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला असून, आता संघ दुसऱ्या सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. याच दरम्यान, भारतीय कर्णधार शुभमन गिल ऑस्ट्रेलियन रस्त्यावर चालत असताना, एका पाकिस्तानी व्यक्तीने आधी गिलशी हस्तांदोलन केले.

हस्तांदोलन झाल्यानंतर लगेचच त्याने 'पाकिस्तान झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या. या पाकिस्तानी व्यक्तीच्या अचानक केलेल्या कृत्याने शुभमन गिल स्तब्ध झाला. गिलचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या कृत्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

मालिका बरोबरीत आणण्यावर भारताचे लक्ष

पहिला सामना गमावल्यामुळे भारतीय संघ मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेडमध्ये होणारा दुसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ दृढनिश्चयी आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल हे तिघेही अपयशी ठरले होते, पण दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.