IPL 2025 (Photo Credit - X)

भारत-पाकिस्तान तणावाचा (India-Pakistan Tension) फटका यंदाच्या आयपीएल 2025 ला देखील बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने आयपीएल (IPL) चे सारे सामने रद्द करण्याचा निर्णय झाल्याची माहिती बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिली आहे. काल. 8 मे च्या रात्री देखील पाकिस्तान आणि भारतामध्ये हल्ले सुरू होताच अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आले होते. या दरम्यान धरमशाला मध्ये सुरू असलेला पंजाब विरूद्ध दिल्लीचा सामना मध्येच थांबवून नंतर रद्द करण्यात आला. स्टेडियम मध्ये उपस्थित प्रेक्षकांना देखील तातडीने स्टेडियम रिकामे करणयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. (हे देखील वाचा: PBKS vs DC, IPL 2025 58th Match Abandoned: पंजाब-दिल्ली सामना रद्द, धर्मशाळा स्टेडियममध्ये पूर्ण ब्लॅकआउट).

यंदाचा आयपीएल सीझन 25 मे 2025 पर्यंत चालणार होता. मात्र आता तो मध्येच थांबवण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी पोहचवण्यासाठी व्यवस्था केली जाणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे. आयपीएलचे आतापर्यंत 57  सामने झाले असून 16 सामने होणार होते. आज संध्याकाळी होणार्‍या LSG vs RCB सह पुढील सारे सामने आता स्थगित झाले आहेत.

आयपीएल 2025 सामने रद्द

22 एप्रिल च्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर आखत पाकिस्तान मध्ये घुसून दहशतवादी तळांना उडवलं आहे. मात्र त्यानंतर पाकिस्तान कडून भारतीय नागरी वस्त्यांवर, नियंत्रण रेषेजवळ सातत्याने हल्ला होत असल्याने भारतानेही आक्रमक कारवाई सुरू ठेवली आहे. पाकिस्तान कडून भारतात येणारे ड्रोन आणि क्षेपणास्त्र पाडली जात आहेत. प्रमुख्याने रात्रीच्या वेळेस हे जोरदार हवाई हल्ले होत असल्याने सध्या सीमाभागा जवळ असलेल्या अनेक गावांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतातील अनेक विमानतळं सध्या बंद ठेवण्यात आली आहेत.