Photo Credit- X

IND vs PAK: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने आले. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने ५ विकेट्सने मिळवलेल्या या विजयानंतर मैदानावर खेळाडूंचे अनेक गंमतीशीर क्षण पाहायला मिळाले. या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज अबरार अहमदने संजू सॅमसनला बाद केले होते आणि त्याने नेहमीप्रमाणे खास शैलीत सेलिब्रेशन केले. तो खेळाडूला बाद केल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे पाहून हातवारे करतो. IND vs PAK: "हे तर खूपच अपमानकारक!" भारताने ट्रॉफी नाकारली, पीसीबी अध्यक्षांची झाली फजिती, पाहा काय घडलं

अबरार अहमदची केली नक्कल

फायनलमध्ये त्याने संजू सॅमसनला बाद केल्यावरही असेच केले. मात्र, भारताच्या विजयानंतर हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि जितेश शर्मा यांनी संजू सॅमसनला समोर उभे करून अबरार अहमदची नक्कल करत त्याच पद्धतीने सेलिब्रेशन केले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बुमराहने हारिस रौफला दाखवला 'आरसा'

त्याआधी, गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या हारिस रौफला 'आरसा' दाखवला. हारिस रौफ फलंदाजीसाठी आल्यावर बुमराहने एका शानदार यॉर्करने त्याचे स्टंप उडवले. रौफला बाद केल्यानंतर बुमराहने केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताने नवव्यांदा जिंकले विजेतेपद

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १९.१ षटकांत १४६ धावा केल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ५७ आणि फखर झमानने ४६ धावांची खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवने ४ बळी घेतले. भारताने हे लक्ष्य १९.४ षटकांत ५ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक ६९ धावा केल्या, तर शिवम दुबेने ३३ धावांचे योगदान दिले. या विजयासह भारताने नवव्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.