Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, भारताने पहिल्या डावात 185 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून नऊ धावा केल्या. दिवसाच्या खेळाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने ख्वाजाला केएल राहुलकडे झेलबाद केले. ख्वाजा आऊट होताच स्टंप घोषित करण्यात आला. ऑस्ट्रेलिया संघ सध्या 176 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या सॅम कॉन्स्टास सात धावा करून क्रीजवर उपस्थित आहे.
Drama at the SCG, with words exchanged between Bumrah and Konstas, followed by a wicket off the last ball of the day 🍿https://t.co/62ZjPEw7RL #AUSvIND pic.twitter.com/kfRPde25SV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 3, 2025
भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट
प्रथम फलंदाजी करताना भारताची वाईट सुरुवात झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर पुनरागमन करणारा शुभमन गिल 20 धावा करुन बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बाॅलचा बळी ठरला. त्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची हाती कमान घेतली. त्यांनी थोडा वेळ घेत स्कोरबोर्ड चालू ठेवला. पण मोठ्या शाॅट मारण्याच्या नादात पंत त्याची मोठी विकेट देवुन बसला. त्यानंतर संगळ्यानी विकेट फेकल्या आणि भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट झाला.
बोलंड-स्टार्कची घातक गोलंदाजी
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला आहे. स्टार्कने 3 आणि बोलंड 4 विकेट घेतल्या आहे. तर कॅमिन्सला 2 आणि लायनला 1 विकेट मिळाली आहे. आता दुसऱ्या दिवशी भारताच्या नजरा ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑलआउट करण्यावर असतील. (हे देखील वाचा: KL Rahul Troll: सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल फ्लॉप, चाहत्यांनी सोशल मीडियावर केले ट्रोल)
बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला
भारताचा लवकर ऑलआऊट केल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच दिवशी डावाची सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली आणि 9 धावांच्या स्कोअरवर त्यांनी पहिली विकेट गमावली. ख्वाजा केवळ 2 धावा करू शकला, तर सॅम कॉन्स्टास 7 धावांवर क्रीजवर उपस्थित आहे.