Navratri Ghatasthapana 2025 HD Images: नवरात्र उत्सवानिमित्त WhatsApp Messages, Greetings द्वारे घटस्थापनेच्या द्या खास शुभेच्छा!

देवीच्या स्वागतासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते. यंदा घटस्थापना करण्यासाठी सकाळचा शुभ मुहूर्त आहे. सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी ६:१५ ते दुपारी १२:३८ पर्यंत.

Navratri Ghatasthapana 2025 HD Images: नवरात्र उत्सवानिमित्त WhatsApp Messages, Greetings द्वारे घटस्थापनेच्या द्या खास शुभेच्छा!
Photo Credit- File

Navratri Ghatasthapana 2025 HD Images: शारदीय नवरात्री उत्सवाला आजपासून म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरुवात होत आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये कलश स्थापना अर्थात घटस्थापनेला विशेष महत्त्व असते. देवीच्या स्वागतासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरात आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते. यंदा घटस्थापना करण्यासाठी सकाळचा शुभ मुहूर्त आहे. सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी ६:१५ ते दुपारी १२:३८ पर्यंत. या व्यतिरिक्त तुम्ही अभिजीत मुहूर्तावरही घटस्थापना करू शकता. घटस्थापना ही केवळ एक पूजा नसून, ही आनंद, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे, ज्यामुळे देवीच्या आशीर्वादाने सर्व प्रयत्नांना यश मिळते.

घटस्थापनेच्या दिवशी मातीत विविध धान्य टाकून त्यावर एका मातीच्या कलशाची स्थापना करण्याची प्रथा आहे. या कलशाला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण केल्या जातात. या मंगलमय उत्सवादरम्यान तुम्ही देखील नवरात्रीच्या शुभेच्छा, घटस्थापना कोट्स आणि मराठी स्टेटस पाठवून आपल्या मित्र-परिवारास शुभेच्छा देऊ शकता.

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

नवरात्री आणि घटस्थापना उत्सवाच्या

सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत

तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला

नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!

आजपासून सुरू होणाऱ्या

नवरात्र ऊत्सव आणि घटस्थापनेच्या

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छ!

नवरात्री आणि घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

यंदाची नवरात्री दहा दिवस चालणार

या वर्षी शारदीय नवरात्री ९ ऐवजी दहा दिवस चालणार आहे. चतुर्थी तिथीची वाढ झाल्यामुळे हा योग जुळून आला आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. या वाढलेल्या दिवसांमुळे उत्सवाचा उत्साह अधिक वाढणार असून देवीच्या भक्तांसाठी हा एक आनंदाचा काळ असणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 22, 2025 07:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).