Photo Credit- File

Marathwada Mukti Sangram Din 2025 HD Images: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. 1948 मध्ये या दिवशी मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र, त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या 565 पैकी 562 संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शविली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैदराबाद संस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि जुनागड संस्थान ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती.हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते.

हैदराबाद संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निझाम वंशाचे राज्य होते. त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. अखेर 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा दिवस मराठवड्यातील जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त WhatsApp Status, Messages, Quotes द्वारा मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन नक्की करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शुरविरांना

विनम्र अभिवादन!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तीसाठी शहीद झालेल्या

सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शुरविरांना

विनम्र अभिवादन!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यवीरांचे योगदान

मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांसारख्या अनेक थोर नेत्यांनी लढा दिला.

या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्याच्या गावागावात हा लढा तीव्र झाला. यात आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले आणि त्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या योगदानाला मराठवाडा कधीही विसरू शकणार नाही.