SA Team (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवार पासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील हा सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 22 षटकांत 3 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यजमान संघ अजूनही 129 धावांनी पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी सध्या एडन मार्कराम 67 चेंडूत 47 धावा करून नाबाद असून कर्णधार टेंबा बावुमा 23 चेंडूत 4 धावा करत नाबाद आहे. तर पाकिस्तानकडून खुर्रम शहजादने 8 षटकांत 28 धावा देत सर्वाधिक 2 बळी घेतले. मोहम्मद अब्बासला एक विकेट मिळाली.

पाकिस्तानचा पहिला डाव 211 धावांवर गारद

पहिल्या दिवशी पाकिस्तानचा संघ 57.3 षटकांत 211 धावांवरच मर्यादित राहिला. पाकिस्तानकडून कामरान गुलामने सर्वाधिक 54 धावा केल्या. बाबर आझम 4 धावा करून बाद झाला, तर कर्णधार शान मसूद 4 धावा करून बाद झाला आणि मोहम्मद रिझवान 27 धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून डॅन पॅटरसनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

किती वाजता सुरु होणार सामना?

दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ आज शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.

कुठे पाहणार लाइव्ह सामना?

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका भारतातील टीव्हीवर स्पोर्ट्स 18-1 SD आणि स्पोर्ट्स 18-1 HD चॅनेलवर थेट प्रसारित केली जाईल. JioCinema ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना येथून तिसऱ्या वनडे सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका: टोनी डी झोर्झी, एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जेन्सन, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, डेन पॅटरसन.

पाकिस्तान: शान मसूद (कर्णधार), सईम अयुब, बाबर आझम, कामरान गुलाम, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, सलमान आगा, आमेर जमाल, नसीम शाह, खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास