Australia Womens National Cricket vs England Womens National Cricket Team Only Test Match : 2025 च्या महिला अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय, तीन टी20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामने खेळले गेले. ऑस्ट्रेलियाने मालिकेत शानदार कामगिरी केली आणि इंग्लंडला पूर्णपणे व्हाईटवॉश केले. महिला कांगारू संघाने मालिकेतील एका स्वरूपात इंग्लंडला व्हाईटवॉश केलेच नाही तर तिन्ही स्वरूपात इंग्लंडला क्लीन स्वीप केले.
अॅशेसच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने तिन्ही स्वरूपांच्या मालिकेत इंग्लंडला व्हाईटवॉश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियन महिला संघाने 2025 ची अॅशेस जिंकून इतिहास रचला. (हेही वाचा - AUS Beat SL 1st Test 2025 Scorecard: पहिल्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी केला पराभव, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमनची घातक गोलंदाजी)
सुरुवातीला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 4 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कांगारू संघाने 21 धावांनी विजय मिळवला. यानंतर, ऑस्ट्रेलियाने मालिकेतील शेवटचा एकदिवसीय सामना 86 धावांनी जिंकला.
यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेतील पहिला सामना 57 धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात कांगारू संघाने डीएलएस अंतर्गत 6 धावांनी विजय मिळवला. यानंतर, शेवटच्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 72 धावांनी पराभव केला.
मग अखेर दोन्ही संघ एकमेव कसोटीसाठी आमनेसामने आले. कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि 122 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने अॅशेसमध्ये इंग्लंडला पूर्णपणे क्लीन स्वीप केले.
अॅनाबेल सदरलँड आणि बेथ मूनी यांनी कसोटीत केला विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून अॅनाबेल सदरलँड आणि बेथ मूनी यांनी कसोटीत शतके झळकावून शानदार कामगिरी केली. सारडालँडने 21 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 163 धावा केल्या. याशिवाय बेथ मुनीने 6 चौकारांच्या मदतीने 106 धावा केल्या. दोन्ही डावांच्या निकालामुळे, ऑस्ट्रेलियाने एकूण 440 धावा केल्या आणि इंग्लंडला एक डाव आणि 122 धावांनी पराभूत केले.