Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात नऊ गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे.
भारताला शेवटच्या विकेट्सची आस
स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला शेवटच्या विकेट्सची आस लागली आहे. आतापर्यंत दोघांनी 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली आहे. लायन 41 धावांवर नाबाद असून बोलॅंड 10 धावांवर नाबाद आहे. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah Broke Kapil Dev Record: जसप्रीत बुमराहने तोडला कपिल देवचा 33 वर्ष जुना विक्रम, कॉन्स्टासची विकेट घेऊन रचला नवा किर्तीमान)
An entire day filled with drama!
The 10th-wicket partnership between Lyon and Boland is now 55 runs 😯
🔗 https://t.co/ycgxNhumqw | #AUSvIND pic.twitter.com/YghCtJ3nmw
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 29, 2024
चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर गारद
चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर गारद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या कांगारुची चांगली सुरुवात झाली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने 70 आणि पॅट कमिन्सने 41 सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून बुमराह-सिराजने जबरदस्त गोलंदाजी केली. बुमराहने 4, सिराजने 3 विकेट घेतल्या. तर जडेजाला 1 विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या 140 धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवशी 474 धावांवर केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास 60 आणि उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी 112 धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स 40 आणि स्मिथ 140 धावा करुन बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.
नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदरने रचली 127 धावांची भागीदारी
यानंतर प्रत्युत्तरात भारतीय डावाला सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली नाही, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण यशस्वी धावबाद होताच विराट कोहलीही चालायला लागला. रोहित शर्माची बॅट पुन्हा फ्लॉप झाली. केएल राहुल उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून 82 धावा निघाल्या.
नितीश कुमार रेड्डीचे शानदार शतक
तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत 28, रवींद्र जडेजा 17 धावांवर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हातात कमान घेतली. दोघांनी 127 धावांची भागीदारी रचली. वॉशिंग्टन सुंदर 162 चेंडूचा सामना करुन 50 धावा करुन बाद झाला. आणि नितीश कुमार रेड्डीने शानदार शतक झळकावले. त्यानंतर चौथ्या दिवशी भारताला शेवटचा धक्का त्याच्या रुपात लागला आणि भारताचा पहिला डाव चौथ्या दिवशी 369 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, बोलंड आणि लायन यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.