Photo Credit- X

PAK vs BAN Super 4 Live Streming: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील सामन्यात बांगलादेशला हरवून भारतीय संघाने अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. आता दुसऱ्या जागेसाठी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात 'करो या मरो'चा सामना होणार आहे. सुपर-४ मध्ये या दोन्ही संघांना आतापर्यंत फक्त भारताकडूनच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, आजच्या सामन्यात जो संघ हारेल, त्याचे आशिया कप २०२५ मधील आव्हान संपुष्टात येईल. Team India New Record: भारतीय संघाने रचला नवा इतिहास; विजयासह श्रीलंकेचा विक्रम केला चकनाचूर

अंतिम फेरीसाठी 'करो या मरो'ची लढत

बांगलादेशविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांची फलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती, त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात ते आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघ जोरदार तयारीने मैदानात उतरतील, कारण अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल.

कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येईल सामना?

  • कधी: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना आज (२५ सप्टेंबर) खेळला जाईल.
  • कुठे: हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल.
  • वेळ: सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल.

हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर लाईव्ह पाहता येतील. तसेच, सोनी लिव्ह ॲप आणि फॅनकोडवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील हेड-टू-हेड

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत २५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी, पाकिस्तानने २० सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर बांगलादेशला केवळ ५ सामन्यांमध्येच यश मिळाले आहे. मात्र, एशिया कप २०२५ च्या आधी बांगलादेशने पाकिस्तानला टी-२० मालिकेत २-१ ने हरवून इतिहास रचला होता.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-११

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग-११: सॅम अयुब, साहिबजादा फरहान, फखर जमां, हुसैन तलत, सलमान आगा, मोहम्मद हॅरिस, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, हारिस रऊफ, फहीम अश्रफ

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग-११: सैफ हसन, तंजीद हसन, परवेज हौसेन, तौहीद ह्रदोय, शामीम हौसेन, झाकीर अली, मोहम्मद शेफुद्दीन, रिशाद हौसेन, तंजीम हसन शाकिब, नासुम अहमद, मुस्तफिजुर रहमान