Team India (Photo Credit- X)

Tem India New Records: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीतील सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या विजयासह अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. भारताला अजून सुपर-४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एक सामना खेळायचा आहे, जो २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, बांगलादेशला हरवल्यानंतर भारताने आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारी टीम बनली भारत

गेल्या अनेक हंगामांपासून भारतीय संघ एशिया कपमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत भारताने एकही सामना गमावलेला नाही. बांगलादेशवरील विजयानंतर भारतीय संघ एशिया कपच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ बनला आहे.

  • आतापर्यंत टीम इंडियाने आशिया कपमध्ये एकूण ७० सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी ४८ सामने जिंकले आहेत.
  • या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंका आहे, ज्यांनी ७१ सामन्यांपैकी ४७ सामने जिंकले आहेत.
  • पाकिस्तानचा संघ ३६ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर बांगलादेशने १५ सामने जिंकले आहेत.

टीम विजय
भारत ४८
श्रीलंका ४७
पाकिस्तान ३६
बांग्लादेश १५

फायनलमध्ये कोणाशी होणार सामना?

आशिया कप २०२५ च्या सुपर-४ मधील दोन्ही सामने जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीचे तिकीट कन्फर्म केले आहे. आता दुसऱ्या जागेसाठीचा निर्णय २५ सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यातून होईल. या सामन्यातील विजेत्या संघाचा सामना २८ सप्टेंबर रोजी भारतीय संघासोबत होईल. विशेष म्हणजे, आशिया कपच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना कधीही खेळला गेलेला नाही. त्यामुळे या वेळी तो झाला, तर तो एक ऐतिहासिक क्षण असेल.