BAN vs ZIM (Photo Credit- X)

Bangladesh National Cricket Team vs Zimbabwe National Cricket Team Match Scorecard: बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 28 एप्रिल (सोमवार) पासून चट्टोग्राममधील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. पहिल्या डावात झिम्बाब्वेला 227 धावांवर रोखल्यानंतर, बांगलादेशने शानदार फलंदाजी करत 444 धावा केल्या आणि 217 धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली. (हे देखील वाचा: PAK vs BAN T20I Series 2025 Schedule: मे महिन्यात बांगलादेश संघ पाकिस्तान दौऱ्यावर; 5 सामन्यांच्या टी 20 मालिकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर)

बांगलादेशकडून पहिल्या डावात शादमान इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी शानदार शतके झळकावली. शादमनने 181 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह 120 धावा केल्या. तर मिराजने 104 धावांची खेळी केली ज्यामध्ये 11 चौकार आणि 1 षटकार होता. अनामूल हक (39), मुशफिकुर रहीम (40) आणि तंजीम हसन साकिब (41) यांनीही उपयुक्त योगदान दिले. बांगलादेशने 129.2 षटकांत सर्व विकेट गमावून 444 धावा केल्या.

झिम्बाब्वेकडून सर्वात यशस्वी गोलंदाज व्हिन्सेंट मासेकेसा होता, ज्याने 31.2 षटकांत 115 धावा देत 5 बळी घेतले. त्याच्याशिवाय वेस्ली माधेव्हेरे, ब्रायन बेनेट आणि वेलिंग्टन मसाकादझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तथापि, बांगलादेशच्या फलंदाजीसमोर झिम्बाब्वेचे गोलंदाज असहाय्य दिसत होते आणि त्यांना कोणतेही महत्त्वपूर्ण यश मिळाले नाही.

तत्पूर्वी, झिम्बाब्वेचा पहिला डाव 227 धावांवर मर्यादित राहिला. संघाकडून शॉन विल्यम्सने सर्वाधिक 67 धावा केल्या, तर निक वेल्चने 54 आणि ब्रायन बेनेट आणि बेन करनने 21-21 धावा केल्या. बांगलादेशकडून तैजुल इस्लामने शानदार गोलंदाजी केली आणि 27.1 षटकांत फक्त 60 धावा देत 6 बळी घेतले. नैम हसनने 2 आणि तंजीम साकिबने 1 विकेट घेतली.