Washington Sundar (Photo Credit - X)

Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील पाचवा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जात आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. मात्र याचदरम्यान भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आणि त्यांना फारशी कामगिरी करता आली नाही. यानंतर अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर काही काळ खेळपट्टीवर टिकून राहण्यात यशस्वी ठरला पण त्यानंतर 66व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सला सुंदर विकेट दिली. कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर सुंदरने पुल खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटजवळून गेला.

 पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णय

यावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील केले, पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळले, त्यानंतर कांगारू संघाच्या कर्णधाराने रिव्ह्यू घेतला आणि स्ट्रायमीटर पाहिल्यानंतर तिसऱ्या अंपायरने त्याला बाद घोषित केले. या विकेटनंतर सुंदरची चांगलीच निराशा झाली. यासह पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णयामुळे भारतीय फलंदाजाला आपली विकेट गमवावी लागली.

वॉशिंग्टन सुंदरला बाद केल्यानंतर चाहते संतापले

वॉशिंग्टन सुंदरला बाद केल्याने चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आपला राग सोशल मीडियावर व्यक्त केला. जिथे चाहते ऑस्ट्रेलियन संघावर चीटर असल्याचा आरोपही करत आहेत. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah, Sam Konstas Argument Video: जसप्रीत बुमराहसोबत सॅम कॉन्स्टासमध्ये जोरदार वाद, उस्मान ख्वाजाला सहन करावा लागला फटका; पाहा व्हिडिओ)