महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 161 जणांना कोरोनाची लागण तर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 161 जणांना कोरोनाची लागण झाली असून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस दलात सुद्धा कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने 55 वर्षापेक्षा अधिक वय असलेले कर्मचारी काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(MLA Atul Benke Tested Covid-19 Positive: राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विट करत दिली माहिती)

राज्यात पोलीस दलात एकूण 14,953 कोरोनाबाधित कर्मचारी असून 2800 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 11,999 जणांची प्रकृती सुधारली असून 154 जणांचा बळी गेल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत.(Coronavirus Update: महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहेत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण, जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)

दरम्यान, राज्य आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासात राज्यात कोरोनाचे एकुण 16,867 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 7,64,281 वर पोहचली आहे. तसेच काल 328 कोरोना रुग्णांची झुंज अयशस्वी ठरली असल्याने राज्यात मृतांचा आकडा 24,103 वर पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात 11,541 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 5,54,711 इतकी झाली आहे.