(Photo Credits: X/@ECOWARRIORSS)

Brazil Rains: दक्षिण ब्राझीलच्या रिओ ग्रांडे डो सुल (Rio Grande do Sul)राज्यात वादळ आणि पुरामुळे मृतांची संख्या 166 वर पोहोचली आहे, असे नागरी संरक्षण संस्थेने म्हटले आहे. 29 एप्रिलपासून तेथे धुवादार पाऊस (Brazil Storms)कोसळत आहे. तिथल्या स्थानिक वृत्त वाहिन्यांच्या म्हणण्यानुसार, 6,37,000 हून अधिक लोकांना पुरातून(Brazil Floods)बाहेर काढण्यात आले आहे. तरी 61 जण अद्याप बेपत्ता आहेत. जवळपास 469 नगरपालिकांमधील सुमारे 2.3 दशलक्ष लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. (हेही वाचा:Brazil Flood Viral Video: ब्राझील च्या पुरात जेव्हा एकमेकांपासून दुरावलेले श्वान पुन्हा मालकाला भेटतं; पहा हृद्यस्पर्शी व्हिडिओ (Watch Video) )

धुवादार पावसामुळे राज्याच्या व्यापार, उद्योग आणि कृषी व्यवसायात लाखो डॉलर्सचे नुकसान झाले आहे, असे सिन्हुआ वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. 29 एप्रिलपासून रिओ ग्रांदे डो सुलला आलेल्या पावसामुळे राज्यातील रस्त्यांवर नुकसान आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रेमध्ये सोमवारी परिस्थिती सुधारली होती, परंतु गुरुवारी सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा पूर आला आहे. (हेही वाचा: Brazil Flood Video: क्षणात होत्याचे नव्हते झाले; ब्राझीलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज पुलावर आदळले (Watch Video))