Brazil Flood Video: क्षणात होत्याचे नव्हते झाले; ब्राझीलमध्ये प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज पुलावर आदळले (Watch Video)
Photo Credit -X

Brazil Flood Video : दक्षिण ब्राझीलमध्ये पुराने(Brazil Flood) रौद्ररुप धारण केले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळए मोठया प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. नागरिक मिळेल त्या मदतीने आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातही अनेक अपघात होताना दिसत आहेत. नुकत्यात समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पूरग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या जहाजाचा भीषण अपघात झाला. समोर असलेला पाण्याखालचा पूल न दिसल्याने बुडालेल्या पुलावर जहाज आदळले(Ferry Boat Crashed). परिणामी हे जहाज पाण्यात थेट उलटले गेले. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून या दुर्घटनेत अनेक प्रवासी दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा:Brazil Rain: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार, महापूरात 56 जणांचा मृत्यू, बचाव कार्य सुरु)

घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

दक्षिण ब्राझीलमध्ये सध्या पुराचा हाहा:कार पहायला मिळत आहे. या पुरात आतापर्यंत अनेक ७५ नागरिकांनी अपला जीव गमावल्याचे समजत आहे. शेकडो ब्राझीलीयन बेपत्ता झाले आहेत. तर असंख्य जखमी झाले आहेत. या पुरातून लोकांना वाचवण्यासाठी ब्राझील सरकारकडून कठोर परीश्रम घेतले जात आहेत. मात्र याच पुराची दाहकता दाखवणारा वेगवेगळ्या व्हिडीओमधून समोर येत आहे.