दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. आम आदमी पक्षाचे संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहायक बिभव कुमार यांच्यावर त्यांनी मारहाणीचे आरोप केले आहेत. या आरोपानंतर ‘आप’ पक्ष आणि स्वाती मालिवाल यांच्यात काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे.  आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी रविवारी आरोप केला की, 'आप' नेते आणि कार्यकर्त्यांच्या कथित "चरित्र हत्या" मोहिमेनंतर तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. (हेही वाचा - Swati Maliwal Assault Case: विभव कुमार मुख्यमंत्री निवासस्थानातून ताब्यात; स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ल्याचा आरोप)

स्वाती मालीवाल यांनी यूट्यूबर ध्रुव राठीवरही गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ध्रुव राठीने आपल्या विरोधात “एकतर्फी” व्हिडिओ पोस्ट करून लोकांमध्ये द्वेष आणखी वाढवला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मिळालेल्या अपमानास्पद संदेश आणि बलात्काराच्या धमक्यांचे अनेक स्क्रीनशॉट तिच्या X हँडलवर शेअर करताना, AAP खासदार म्हणाली की तिच्यावर कथित चारित्र्य हनन आणि तिच्याच पक्षाच्या नेत्यांकडून पीडितेवर आरोप होत असल्याने त्या व्यथीत आहेत.

पाहा पोस्ट -

“माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच युट्यूबर ध्रुव राठीच्या एकांगी व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे.” असा आरोप स्वाती मालिवाल यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.