Swati Maliwal Assault Case: विभव कुमार मुख्यमंत्री निवासस्थानातून ताब्यात; स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ल्याचा आरोप
स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
Swati Maliwal Assault Case: 'आप'च्या खासदार स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आताची मोठी बातमी समोर येत आहे. काही वेळापूर्वी दिल्ली पोलिसांचे (Delhi Police) पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विभव कुमार (Vibhav Kumar) ला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आहे. स्वाती मालीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांच्यावर मारहाण आणि गैरवर्तनाचा आरोप केला आहे. स्वाती मालीवाल यांनीही याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यापासून दिल्ली पोलिस विभव कुमारचा शोध घेत होते. दिल्ली पोलिसांना एसएचओ सिव्हिल लाइन्स आणि अतिरिक्त डीसीपी नॉर्थ सीएम हाऊसमध्ये पोहोचल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचा ताफा सीएम हाऊसवर पोहोचला. (हेही वाचा - Swati Maliwal Assault Case: पोलिसांनी स्वाती मालीवालच्या मदतीने रिक्रिएट केला 13 मे चा सीन (Watch Video))
ANI ट्विट -
Former PS of Delhi CM Arvind Kejriwal, Bibhav Kumar has been detained by Delhi Police in connection with the AAP MP Swati Maliwal assault case pic.twitter.com/RrukV9GYJ2
— ANI (@ANI) May 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2024 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

