EVMs Found With BJP Tags in Bankura: देशभरात लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यात(Lok Sabha Elections 2024) मतदान पार पडत आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) ने बांकुरा येथील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन्स (EVM) च्या अखंडतेवर गंभीर आक्षेप घेतला आहे. त्याबाबतची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. भाजपने छेडछाड करून मतांची हेराफेरी करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. पुरावा म्हणून टीएमसीने बांकुरा येथील रघुनाथपूर भागात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचे टॅग असलेले 5 ईव्हीएमचा फोटो एक्सवर शेअर केला. टीएमसीने दावा केला आहे की भाजप निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या टॅगसह ईव्हीएम वापरत आहे, त्यावर निवडणूक आयोगाने (EC) त्वरीत या प्रकरणाची चौकशी तपासनी केली. आरोपांना प्रत्युत्तर देताना, निवडणूक आयोगाने (EC) सांगितले की, उमेदवार आणि त्यांच्या एजंट्सनी कमिशनिंग दरम्यान कॉमन ॲड्रेस टॅगवर स्वाक्षरी केली होती. मात्र, प्रक्रियेदरम्यान केवळ भाजपचे एजंट उपस्थित होते. नंतर मतदानादरम्यान सर्व एजंटांच्या सह्या घेण्यात आल्या.(हेही वाचा: )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)