MLA Atul Benke Tested Covid-19 Positive: राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना कोरोना विषाणूची लागण; ट्विट करत दिली माहिती
NCP MLA Atul Benke (PC - ANI)

MLA Atul Benke Tested Covid-19 Positive: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका आमदाराला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (MLA Atul Benke) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अतुल बेनके यांनी स्वत: आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

बेनके यांना 27 ऑगस्टला त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली. शनिवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. बेनके यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी त्यांच्या कार्यत्यांनी प्रार्थना केली आहे. (हेही वाचा - UGC Final Year Examinations: 30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील, तर परीक्षा कशा घ्यायच्या? उदय सामंत यांचा सवाल)

दरम्यान, अतुल बेनके यांनी आपल्या ट्विटरवर यासंदर्भात माहिती देताना म्हटलं आहे की, 27 तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले, त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी करावी.! आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. हा लढा आपण जिंकणारच.! असा विश्वासदेखील बेनके यांनी व्यक्त केला आहे.