Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
13 minutes ago

Viral: होळीचा रिल्स शुट करताना तरुणीसोबत घडलं असं काही, पाहा व्हायरल Video

राष्ट्रीय Pooja Chavan | Mar 22, 2024 11:06 AM IST
A+
A-

Viral Video: देशभरात होळीचा उत्सव सुरु झाला आहे. ठिकठिकाणी तरुण मंडळी होळी निमित्त रिल्स बनवत आहे.सद्या सोशल मीडियावर एक रिल्स (Reels) व्हायरल होत आहे. होळी निमित्त तरुणींने साडी नेसून स्टंटबाजी केली परंतु ही स्टंटबाजी करणं तरुणीला भोवलं आहे. प्रसिध्द मिळवण्यासाठी तरुणाई जीव धोकात घालत भलतेच धाडस करत असतात. या व्हिडिओवर अनेकांनी संतापाची प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा- रेकॉर्डवरील गुन्हेगार अध्यात्मात रमला)

 

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पार्कमध्ये एक तरुणी साडी नेसून स्टंटबाजी करत असते. तरुणी पोल फ्रेमवर लटकली आहे. दरम्यान पायाला तिने कलर पॉप अपही चिकटवला आहे. करुणी पोल सोबत लटकली असताना पॉपमधून तरुणीच्या साडीने पेट घेतला आणि तिच्या पायाला चटका लागला. पटकन आग विझवण्याचा प्रयत्न करते. सोबत असलेले मित्र तीच्या जवळ जातात आणि दुर्घटनेतून बचाव करतात. सुदैवाने तरुणीला कोणतीही जखम झाली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalu Kirar (@shalugymnast)

होळीचा रिल्स शुट करताना हा प्रकरा घडतो. हा व्हिडिओ एकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अनेक प्रतिसाद दिले आहेत. अनेकांनी तीला स्टंट बाजी करू नकोस असा सल्ला दिला आहे. दरम्यान सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. तरुणी पिढी अनेक वेगवेगळ्या कंटेटचा व्हिडिओ बनवताना दिसत आहे.

RELATED VIDEOS