Eknath Shinde Celebrates Holi With Family (फोटो सौजन्य - X/@mieknathshinde)

Eknath Shinde Celebrates Holi With Family: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे (Thane) येथील त्यांच्या निवासस्थानी होळी साजरी केली. यावेळी शिंदे यांच्यासोबत अनेक शिवसेना नेते आणि समर्थक होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत 'X' हँडलवर त्यांच्या कुटुंबीयांसोबत होळी (Holi 2025) साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.

या पोस्टमध्ये एकनाथ शिंदे यांनी धुविवंदनाच्या शुभेच्छा देताना म्हटलं आहे की, 'रंगुनी जाऊ रंगात आता, अखंड उठू दे मनी तरंग...दूर सारून दुःख निराशा, उधळूया आज सप्तरंग...#धुलिवंदन सणानिमित्त आज माझ्या #ठाणे येथील निवासस्थानी कुटुंबासोबत नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला.' (हेही वाचा - Holi 2025: होळी खेळताय? जाणून घ्या कशी घ्यावी त्वचा आणि केसांची काळजी (Tips))

यावेळी एकनाथ शिंदे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व भागात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात आम्ही आनंदाचा वर्षाव करत आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी राज्याला अधिक आनंदी करण्यासाठी काम करत आहोत. मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अधिकृत 'एक्स' हॅन्डलवरून होळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. 'सर्वांना आनंदी आणि उत्साही धुलिवंदनाच्या शुभेच्छा! महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडवणारे नवोपक्रम आणि प्रगतीचे रंग साजरे करून, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.