Slippers Made from Body Skin For Mother: रेकॉर्डवरील गुन्हेगार अध्यात्मात रमला, शरीराच्या त्वचेपासून आईसाठी कातड्याचा जोडा शिवला (Watch Video)
Slippers | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक तरुण आपल्या मातृप्रेमामुळे चर्चेत आला आहे. त्याने म्हणे स्वत:च्या शरीराची त्वचा काढून आईसाठी चप्पल ( Slippers Made from Body Skin For Mother) बनवली आहे. रौनक गुर्जर असे या तरुणाचे नाव आहे. या महाभागावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी हत्या, मारहाण, चोरी अशा विविध 37 प्रकरणांमध्ये त्याचे नाव प्रमुख आरोपी म्हणून आहे. इतकेच नव्हे तर गुन्हेगारी वर्तुळात याची बरीच चर्चा असते. सन 2019 मध्ये झालेल्या एका पोलीस चकमकीत याला गोळीही लागली आहे. ज्यामुळे त्याला चालताना अडथळा निर्माण होतो. आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी असली तरी आईबद्दल आपल्याला प्रचंड प्रेम आहे आणि तुरुंगामध्ये आपल्यात अनेक बदल झाले. आईला चप्पल बनवावी ही प्रेरणा आपल्याला रामायणातून (Ramayana) मिळाल्याचा तो दावा करतो.

रौनक गुर्जर हा जवळपास तीन डझनहून अधिक प्रकरणात मध्य प्रदेश पोलीस दप्तरी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यामुळे अनेकदा त्याची रवानगी तुरुंगातही झाली आहे. मात्र अलिकडील काही काळात तो अध्यात्मीक झाला आहे. त्याचे मन भक्ती, रामायण यांमध्ये रमू लागले आहे. त्याने सांगितले की, रामायण वाचल्यानंतर आपल्या मनात परिवर्तनाचा विचार आला. या जगामध्ये आईपेक्षा कोणच श्रेष्ठ नसते. त्यामुळे त्याने आपल्या शरीराची त्वचा उतरवून त्याचे जोडे बनवावेत आणि आईच्या चरणी अर्पण करावेत. ही कृती करताना त्याला प्रचंड वेदनाही झाल्या. आईसाठी चप्पल बनवल्यावर रौनक आता भागवत कथा करु लागला आहे. जी ऐकण्यासाठी दूर-दूरहून लोक येऊ लागले आहेत. (हेही वाचा, Madhya Pradesh Shocker: माहेरी जाण्यास नकार दिल्याने पत्नीची विहिरीत उडी मारून आत्महत्या, उज्जैन येथील धक्कादायक घटना)

आईसाठी त्वचेपासून चप्पल बनविणाऱ्या या तरुणाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. उज्जैन येथील चिमनगंज येथील ढांचा भवन परिसरात राहणाऱ्या 39 वर्षी तरुण रौनक गुर्जर याने सांगितले की, रामायण वाचल्यावर माझे विचार पूर्णपणे बदलले. त्यामुळे मी माझ्या शरीरापासून आईसाठी चप्पल बनवली. त्यामुळे तरी माझे कर्म बजलू शकेल. रौनक याचा आईला चप्पल घालतानाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याची आई त्याला कवेत घेऊन रडत असल्याचे दिसते. (हेही वाचा, NCERT कडून सामाजिक शास्त्रामध्ये रामायण, महाभारत यांचा समावेश करण्याची शिफारस; प्रस्ताव विचाराधीन)

व्हिडिओ

दरम्यान, रौनक याची आई निर्मला गुर्जर यांनी सांगितले की, त्यांना माहिती होते की, त्यांचा मुलगा असे काहीतरी करतो आहे. मला आनंद आहे की, तो चांगल्या मार्गावर येऊ पाहात आहे. असाच मुलगा परमेश्वराने सर्वांना द्यावा. देवाकडे माझी प्रार्थना आहे की, आता त्याच्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ नये.