रोहित शर्मा लॅम्बोर्गिनीची चावी देताना | (Photo Credits: rohitsaraiya.official/Instagram

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या 'Dream11' जाहिरातीतील वचन पूर्ण करत सोमवारी (19 मे) आपल्या प्रसिद्ध Lamborghini Urus कारचा ताबा एका भाग्यवान चाहत्याकडे सोपवला. ही हृदयस्पर्शी भेट चाहत्यांसाठी खास ठरली आहे. 264 हा विशेष क्रमांक असलेली ही Lamborghini कार रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील विक्रमी 264 धावांच्या डावाची आठवण करून देते. सुमारे ₹4 कोटी किंमत असलेल्या या लक्झरी SUV ला रोहितने अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर फिरवले आहे, ज्यामुळे ती त्याच्या चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय ठरली होती.

लॅम्बोर्गिनी कार बक्षीस देण्याचे

IPL 2025 च्या सुरुवातीला, Dream11 च्या जाहिरात मोहिमेत रोहित शर्मा याने ही कार बक्षीस देण्याचे मजेशीर वचन दिले होते. दोन भागांत असलेल्या या जाहिरातीत रोहित आधी भावनिक होऊन कार देण्याची घोषणा करतो आणि नंतर एका चाहत्याला ही कार चालवत जाताना पाहून हैराण होतो, शेवटी त्याला घरी जाण्यासाठी रिक्षा पकडावी लागते. ही कार खरोखर रोहितचीच आहे की नवीन, याबद्दल सुरुवातीला अनेक तर्कवितर्क होते. मात्र सोमवारी समोर आलेल्या प्रत्यक्ष दृश्यांमधून हे स्पष्ट झाले की रोहितने खरोखर आपल्या खास Lamborghini Urus गाडीच दिली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा, 'मुंबईत जेव्हा तिकिट मिळणार नाही... मला माहित आहे कोणाला संपर्क करावा'; वानखेडे स्टेडियममध्ये Rohit Sharma Stand चे अनावरण होताच Rahul Dravid कडून हिटमॅनला शुभेच्छा (Video))

चाहत्याकडे कार सूपूर्तकरताना, रोहित शर्मा

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

A post shared by Rohit Saraiya (@rohitsaraiya.official)

दरम्यान, IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने दमदार पुनरागमन केले आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांत अपयश आल्यानंतर त्यांनी आता जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शर्यतीत आघाडी घेतली आहे. मुंबई इंडियन्सने 12 सामन्यांतून 14 गुण मिळवले असून, थेट प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामने जिंकणे आवश्यक आहे.

सध्या मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यासोबत अंतिम प्लेऑफ स्थानासाठी सुरू आहे. गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ आधीच टॉप 4 मध्ये स्थान पटकावून पुढे गेले आहेत.

IPL 2025 च्या अंतिम टप्प्यात प्रत्येक सामना आणि प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित शर्माने मैदानाबाहेर दिलेला भावनिक आणि मन जिंकणारा संदेश पाहता, आता मुंबई इंडियन्सचे चाहते मैदानावर देखील असाच काहीतरी विशेष पाहण्याच्या प्रतिक्षेत आहेत.