
भारतामध्ये आज धुलिवंदनाचा (Dhulivandan) आनंद साजरा केला जात आहे. होळीचे रंग उधळत देशभर जल्लोष साजरा केला जात असताना राजस्थान (Rajasthan) मध्ये दोसा येथे या सेलिब्रेशनला गालबोट लागल्याचं वृत्त समोर आलं आहे. होळीच्या आधी रंग लावून घेण्यास नकार दिल्याने 25 वर्षीय तरूणाची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना बुधवार रात्रीची आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत मुलाचं नाव हंसराज आहे.
राजस्थान मध्ये रालवास गावामध्ये अशोक, बबलू आणि कालूराम हे तिघं हंसराजला बुधवारी रंग लावायला आले होते. हंसराज तेव्हा लायब्ररी मध्ये होता. मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या हंसराजने त्याला रंग लावायला नकार दिला. या नकाराने तिघंही संतापले. त्यांनी हंसराजला लाथा-बुक्क्या, बेल्टने मारहाण केली. रागाच्या भरातच एकाने हंसराजची गळा दाबून हत्या केली. HT च्या वृत्तानुसार ही माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश अग्रवाल यांनी दिली आहे.
हंसराजच्या कुटुंबाने भरपाईची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी सरकारी नोकरी, 50 लाख मदत आणि आरोपींची तातडीने अटक अशी मागणी केली आहे. दरम्यान हंसराजचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबियांनी गुरूवारी पहाटेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. Holi 2025: होळी खेळताय? जाणून घ्या कशी घ्यावी त्वचा आणि केसांची काळजी (Tips) .
आज राजस्थानमध्ये शांततापूर्ण वातावरणामध्ये होळीचा सण साजरा व्हावा यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. आज धुलिवंदन आणि शुक्रवारच्या नमाजचा दिवस एकच आल्याने अनेक ठिकाणी पोलिसांवर ताण होता.