Dombivli boiler blast accident (PC -X/ANI)

Dombivali Blast: डोंबिवलीतील (Dombivali) रासायनिक कारखान्यातील बॉयलर स्फोटातील (Dombivli Boiler Blast Accident) मृतांची संख्या 10 वर पोहोचली असून बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी घटनास्थळाची पाहणी करून हे बचावकार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी बचाव कार्य चालू आहे. आम्ही हे बचाव कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत, असं कदम यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, कदम यांनी घटनेचा आढावा घेतला आणि भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी योजनांवर चर्चा केली. 'मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या दुःखद घटनेचा आढावा घेण्यासाठी मी आज घटनास्थळी आलो आहे. सध्या सुरू असलेल्या बचाव कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याच्या आणि धोकादायक रासायनिक युनिटला येथून तातडीने स्थलांतरित करण्यासाठी योजना तयार करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. या भेटीनंतर आराखडा अंतिम करण्यासाठी आम्ही आमच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहोत,' असेही कदम यांनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -Dombivli Blast: डोंबिवली स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता यांना अटक)

या घटनेवर विरोधकांची भूमिका काय आहे, असे विचारले असता ते म्हणाले, या ठिकाणी राजकारण करणे योग्य नाही, असे माझे मत आहे. जर विरोधकांना हातभार लावायचा असेल तर त्यांनी नेहमीच विरोध करू नये, तर आम्हाला सहकार्य करावे, पाठिंबा द्यावा. तथापी, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या भागात औद्योगिक सुरक्षा उपायांचा अभाव असल्याची टीका केली. येथे कोणताही औद्योगिक सुरक्षा विभाग नाही. या भागात पाहिल्यास, असा कारखाना रहिवासी भागाजवळ नसावा आणि हा सर्वात मोठा गुन्हा आहे. एक तांत्रिक व्यक्ती इथे असायला हवी होती. सामान्य मजुराकडून अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. या स्फोटासाठी औद्योगिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, असं दानवे म्हणाले होते. (हेही वाचा -  Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवलीतील बॉयलर स्फोटाच्या ठिकाणी डोझिंग ऑपरेशन सुरू (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

औद्योगिक क्षेत्राच्या आजूबाजूच्या निवासी भागात वाढ झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पूर्वी औद्योगिक क्षेत्र होते, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये, रहिवाशांची संख्या वाढली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, आम्ही एकतर धोकादायक रासायनिक युनिट सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा विचार करत आहोत, असं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाणे पोलिसांनी अमुदान केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत.