Dombivali Blast | X

डोंबिवली कंपनी स्फोट प्रकरणी नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनीच्या फरार मालक मालती मेहताला अटक करण्यात आली आहे. डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये अकरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहतांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे.  (हेही वाचा -  Boiler Explosion at Factory in Dombivli: डोंबिवलीतील बॉयलर स्फोटाच्या ठिकाणी डोझिंग ऑपरेशन सुरू (Watch Video))

डोंबिवली येथील एमआयडीसीतील अमुदान स्फोटातील मुख्य आरोपी मालती मेहता या नाशिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी रात्रीपासून नाशिक क्राईम ब्रांच युनिट एक आणि  आणि ठाणे क्राईम ब्रांच पोलिसांनी संयुक्त पद्धतीने कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीमधील अमुदान कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. या स्फोटाची इतकी भीषण होती की, या घटनास्थळी दोन ते तीन कंपन्यांनाही आग लागली. या आगीच्या भीषण दुर्घेटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यानंतर पोलिसांकडून स्फोट झालेल्या अमुदान कंपनीचे मालक मालक प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह इतर संचालक व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे मालक फरार होते.

डोंबिवलीत केमिकल फॅक्ट्रीत झालेल्या स्फोटानंतर स्थानिक रहिवाशांचे मोठं नुकसान झाले आहे. याचं सर्वेक्षण करण्यासाठी केडीएमसीचे कर्मचारी नुकसान झालेल्या रहिवाशी इमारतींची पाहणी करत आहेत.