Viral Video: एक्सप्रेस ट्रेनमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन प्रवाशांनी सामान ठेवण्यावरून वाद केल्याचा व्हिडिओत दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओला पाहून चक्क रेल्वे अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. व्हिडिओत दोन प्रवाशी सामाना ठेवण्या करिता भांडण करत आहे. या भांडणामुळे इतर प्रवाशांनी देखील संतापाची प्रतिक्रिया दिली आहे.( हेही वाचा- दिल्ली मेट्रो मध्ये मुलींच्या होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ चर्चेत मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेत एक प्रवाशी दारूच्या नशेत होता. दुसरा प्रवाशी कुटुंबासोबत रेल्वेतून प्रवास करत होता. दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने त्याचे सामान दुसऱ्या प्रवाशाच्या सीटवर ठेवले होते. सुरवातीला त्याने सीटवर सामान उचलण्यासा सांगितले होते. त्यावेळी त्याने दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली.  त्याने प्रवाशाला तुझं सामान इथून घेऊन जा अन्यथा खिडकीबाहेर फेकून देईन, असं सांगताना दिसत आहे. यावरून त्या दोघांमध्ये तुंबळ भांडण झालं आहे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीने त्याचे एक ऐकले नाही त्यांच्या जोरात वाद झाला. एकाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की,  “कृपया तुमचा पीएनआर क्रमांक आणि मोबाईल नंबर थेट मेसेज (DM)द्वारे शेअर करा. जेणेकरून आम्हाला लवकर कारवाई करता (Fight Video) येईल. किंवा railmadad.indianrailways.gov.in वर तुमची समस्या मांडू शकता. जलद संपर्क साधण्यासाठी १३९ क्रमांक डायल करू शकता.