Rajdhani Express Viral Video: ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना पाळीव कुत्रा प्लॅटफॉर्म आणि रेल्वे रुळांमध्ये पडल्याची (Pet Dog Accident) संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना राजधानी एक्सप्रेसची (Rajdhani Express) बोगी क्रमांक 193751 जवळ घडली. मालकाने धावती राजधानी एक्सप्रेस ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न कुत्र्याच्या जीवावर बेतला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत मालकावर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं काय घटलं?
राजधानी एक्सप्रेसची बोगी क्रमांक 193751 जवळ मालक त्याच्या कुत्र्यासोबत उभआ होता. त्याने ती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मालकाने कुत्र्याचा पट्टा काढून तो पट्टा हातात धरला होता आणि कुत्र्याला त्याच्या मानेच्या पट्ट्याने पडकले होते. ट्रेन येताचमालकाने अचानक कुत्र्याला ओढले. मालकाचा ताण सहन करू शकला नाही. त्याला नीट पळता अले नाही आणि सावरण्याच्या आधीच तो ट्रेन खाली रुळांवर पडला.
या घटनेनंतर तेथे लोक जमा झाले. ट्रेन पुढे जात असताना, मालक कुत्र्याला इकडे-तिकडे पाहत राहिला. त्याच्या जवळ असलेल्या नागरिकांनीही त्याला ट्रेन खाली दिसतो हे पाहण्याचा प्रयत्न केला. घटनेची नेमकी वेळ आणि ठिकाण अद्याप समोर आलेले नाही.
When money can't buy wisdom! pic.twitter.com/suADun73fu
— Trains of India (@trainwalebhaiya) April 1, 2025
मालकावर कायदेशीर कारवाईची मागणी
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्राणीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे. मालकाच्या निष्काळजीपणाचे आणि बेजबाबदार वर्तनाचा निषेध केला आहे. सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे स्थानकांवर जिथे असे अपघात होऊ शकतात. त्या ठिकाणी पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेबाबत कठोर नियमांची आवश्यकता अनेकांनी अधोरेखित केली आहे.