
MP Shocker: शुक्रवारी रात्री रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निखिल चौरसिया याचा मृतदेह नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला होता. रात्री कुत्र्यांनी (Dog) मृतदेहाचे लचके तोडले. शनिवारी सकाळी मृताच्या कुटुंबीयांनी मृतदेह (Dead Body) पाहिला तेव्हा त्यांना तरुणाच्या मानेवर कुत्र्यांनी हल्ला केल्याचे आझळले
कुटुंबीयांनी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. ड्युटीवर रात्रीच्या वेळी कोणीही रक्षक तैनात नव्हता असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. रात्री 3.30 वाजता पाणी पिण्यासाठी बाहेर गेलो आणि त्याच वेळी एका कुत्र्याने त्याच्या शरीरातील मांस फाडले आणि ते घेऊन पळून गेला असे उपस्थितींनी म्हटले. या प्रकरणाची तक्रार सीएम हेल्पलाइन 181 वर करण्यात आली आहे.
या घटनेवरून कुटुंबातील सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. सिव्हिल सर्जनच्या म्हणण्यानुसार गार्डला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. सुरुवातीला रुग्णालय व्यवस्थापन ही घटना स्वीकारत नव्हते. जिल्हा रुग्णालयातील सिव्हिल सर्जन डॉ. सुधीर विजयवर्गीय यांनी शनिवारी रात्री या घटनेची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जाईल भविष्यात आम्ही प्रणाली सुधारण्याचा प्रयत्न करू. तसेच, भविष्यात अशी घटना घडू नये याची काळजी घेतली जाईल, असे ही ते म्हणाले.
मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजर नाही
गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात मृतदेह ठेवण्याची व्यवस्था नाही. काही महिन्यांपूर्वी झाड पडल्याने शेड आणि फ्रीजरचे नुकसान झाले. विभागाने खराब झालेले फ्रीजर भंगार म्हणून विकले. मृत निखिल चौरसिया हा बाणापूरचा रहिवासी होता. तरुण बाईकवरून लग्नाला जात होता. तेव्हा एका वाहनाने त्याला धडक दिली.