
Animal News: उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश (Rishikesh News) येथील एक काहीशी विचीत्र पण हस्यास्पद वाटणारी घटना इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये एक भटका बैल चक्क स्कूटर (Bull Rides Scooter) चालवताना दिसत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही अनपेक्षित घटना सोशल मीडियावर अल्पावधीतच व्हायरल (Viral Video) झाली, ज्यामुळे नेटीझन्सना हसू आवरले नाही आणि आश्चर्यही वाटले. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर मीम्सचे उधान आले आहे.
प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बैल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्थिर स्कूटरजवळ येत असल्याचे दिसून आले आहे. काही सेकंद वाहनाभोवती फिरल्यानंतर, बैलाने स्कूटरचा वास घेतल. त्यानंतर त्याने त्याचे पुढचे पाय स्कूटरवर ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्कूटर पुढे सरकू लागली, जी प्राण्याच्या वजनाने आणि गतीने चालत होती. (हेही वाचा, Bull Jumps Viral Video: वळूची हवेत उडी, अनकांनी म्हटले व्वा! सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल)
बैलाची स्कूटर स्वारी
तीन वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संकलित केलेल्या व्हायरल फुटेजमध्ये एक भटका बैल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका स्थिर स्कूटरजवळ येत असल्याचे पाहायला मिळते. वास घेतल्यानंतर, बैल त्याचे पुढचे पाय गाडीवर ठेवतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्कूटर पुढे सरकू लागते, प्राण्याच्या वजनाने आणि हालचालीने पुढे पुढे जाताना दिसते. (हेही वाचा, Bull Climbs Onto Roof of the Police Station: बैल चढला पोलीस स्टेशनच्या छतावर, उत्तर प्रदेशमधील घटना)
ते 12 सेकंद - आणि एक अपघात
सीसीटीव्ही फुटेजनुसार, सुमारे 10 ते 12 सेकंद, बैल सरळ उभे राहण्यासाठी प्रयत्न करतो. पण, वजनामुले स्कूटर पुढेपुढेच जात राहते. अखेर स्कूटर भिंतीवर जाऊन आदळते. त्यानंतर बैल थोडासा अडखळतो पण जखमी न होता शेपूट हलवत निघून जातो. जणू काही घडलेच नाही.
बाईक चालवणाऱ्या बैलाचा व्हिडिओ पहा (सीसीटीव्ही फुटेज):
इंसानों को स्कूटी चोरी करते हुए बहुत बार देखा होगा लेकिन ऋषिकेश में स्कूटी चोरी का मामला कुछ अलग है। यहां गली में घूमने वाले आवारा सांड भी बाइक स्कूटी का शौक रखते है। pic.twitter.com/37TRoCzhcb
— bhUpi Panwar (@askbhupi) May 2, 2025
नेटिझन्सनी दिल्या मीम्ससह प्रतिक्रिया
क्लिपने X (पूर्वी ट्विटर) सारख्या प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओने त्वरित लोकप्रियता मिळवली, जिथे वापरकर्त्यांनी पोस्ट विनोदी टिप्पण्यांनी भरली. एका वापरकर्त्याने विनोद केला, आजवर लोकांना स्कूटी चोरताना पाहिले, इथे बैलाला पाहतोय. दुसरा म्हणतो, ऋषिकेशच्या बैलाला स्कूटीची आवड असल्याचे दिसते!, आणखी एकाने लिहिले, सांड भाईचा ड्रायव्हिंग लायसन्स तपासा! हा बैल दिशा चुकला आहे!'
दरम्यान, या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले, काहींना तो हास्यास्पद वाटला. पण, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या प्राण्यांबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही प्रेक्षकांनी वाहने दुर्लक्षित ठेवण्याचे धोके आणि शहरी भागात प्राण्यांचे अप्रत्याशित वर्तन यावर लक्ष वेधले आहे.