Women's Drug Party | (Photo credit: archived, edited, representative image)

तरुणाईमध्ये वाढता ड्रग्ज (Drugs) वापर, त्यांचे अंमली पदार्थांच्या अंमलाखाली येणे हा सामाजिक चिंतेचा विषय ठरला आहे. त्यातच आता महिलांमध्येही ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढले आहे की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. मुंबई (Mumbai) येथील दोन महिलांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Women Viral Video) झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, या दोन्ही महिला ऑटोरिक्षामध्ये बसून कथीतरित्या ड्रग्जचे सेवन (Women's Drug Party) करत आहेत. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सदर महिला ड्रग्ज किती महाग झाले आहे आणि त्याचा स्थानिक बाजारात काय दर आहे हे देखील सांगताना व्हिडिओत दिसतात. सोशल मीडिया मंच एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर हा व्हिडिओ एका वापरकर्त्याने शेअर केला आहे. जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबई पोलीस, नार्कोटीक्स ब्युरो आणि स्थानिक राजकीय नेते अस्लम शेख यांनाही टॅग करण्यात आला आहे.

'सिगारेट जमत नाही, त्याने डोके जड होते'

सांगितले जात आहे की, हा धक्कादायक व्हिडिओ मुंबई येथील मालाड (Malad) परिसरातील मालवणी (Malvani) येथील आहे. ज्यायमध्ये दोन महिला ऑटोरिक्षात बसून आरामात कथितरित्या ड्रग्ज सेवन करत आहेत. कथितरित्या इतक्याचसाठी की, त्या ज्या प्रकारचे ड्रग्ज घेत आहेत त्याची नेमकी व्हिडिओतून पुष्टी होत नाही. पण, एका व्यक्तीने या दोन्ही महिलांशी संवाद साधला. सदर व्यक्तीने या महिलांना विचारले की, हे तुम्ही काय करत आहात? हे अशा प्रकारे ड्रग्ज सेवन करणे चांगले नाही. यावर त्या महिला म्हणतात की, काय करणार आम्हाला आता सवय लागली आहे. त्यावर तो व्यक्ती पुन्हा म्हणतो, हे शरीराला अपायकारक आहे. त्यापेक्षा तुम्ही सिगारेट पिऊ शकता. पण, महिला आपल्याच मुद्द्यावर ठाम.. ''नाही.. सिगारेट जमत नाही. त्याने डोके जड होते.'' मग हा व्यक्ती विचारतो, हे तुम्हाला मिळते तरी कोठे? या महिला सांगतात, इथेच मिळते 'घोडेवाला के पास'. खूपच महाग झाले आहे. (बहोत मेहेंगा हुआ हैं) दो सौ रुपया पुडी बेचता है, अशा प्रकार हा व्यक्ती आणि या महिला यांच्यात संवाद होताना दिसतो. (हेही वाचा, Mumbai News: मालाडमध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्याला मुंबई पोलिसांनी घातल्या बेड्या, 20 लाख रुपयांचे एमडी जप्त)

रिक्षामध्ये ड्रग्जसेवन करताना महिला

दरम्यान, असिफ शेख (नेटवर्क इंजिनिअर) नावाच्या वापरकर्त्याने @aasif_o या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. जो जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबई पोलीस, नार्कोटीक्स ब्युरो आणि स्थानिक राजकीय नेते अस्लम शेख यांनाही टॅग करण्यात आला आहे. या वापरकर्त्याने व्हिडिओसोबत इंग्रजी पोस्ट लिहीली आहे. ज्याचा मराठी भावार्थ असा की, 'वडा पाव घेण्यापेक्षा ड्रग्स विकणे आणि सेवन करणे सोपे आहे. मुंबईत वडा पाव आणि ड्रग्जची किंमत जवळजवळ सारखीच आहे. एका पुडीसाठी 190 ते 200 रुपये. तुम्ही कशाची निवड कराल? मालवणी गेट क्रमांक 06.' दरम्यान, हा व्हिडिओ पाहून पोलीस काय कारवाई करणाय याबाबत उत्सुकता आहे.