Best Actress At Cannes 2024: अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास; कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री
Anasuya Sengupta (PC - Instagram)

Best Actress At Cannes 2024: बल्गेरियन दिग्दर्शक कॉन्स्टँटिन बोझानोव यांच्या 'द शेमलेस' या हिंदी भाषेतील चित्रपटातील प्रमुख कलाकारांपैकी एक असलेल्या अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) 2024 च्या कान्स चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) अन सरटेन रिगार्ड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. सेनगुप्ता ही मूळचे कोलकाता येथील असून, या श्रेणीतील सर्वोच्च पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कलाकार ठरली आहे. शनिवार 25 मे रोजी या उत्सवाची सांगता होणार आहे.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास -

अनसूया सेनगुप्ता यांनी हा ऐतिहासिक पुरस्कार जगभरातील समलैंगिक समुदाय आणि इतर उपेक्षित समुदायांना समर्पित केला. यावेळी अनसूया म्हणाली की, 'तुमच्या समानतेसाठी लढण्यासाठी तुम्हाला समलिंगी असण्याची गरज नाही, तुम्हाला मुख्य प्रवाहातून काढून टाकणे दयनीय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला समलिंगी असण्याची गरज नाही.' (वाचा - Cannes 2024: 'कान्स'मध्ये Jacqueline Fernandez चा जलवा, सोनेरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली खूप आकर्षक)

कोण आहे अनसूया सेनगुप्ता?

अभिनेत्री असण्यासोबतच अनसूया प्रॉडक्शन डिझायनर देखील आहे. अनुसया मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखली जाते. सध्या ती गोव्यात राहते. अनसूयाने अभिनेत्री नीना गुप्ता आणि तिची मुलगी मसाबा गुप्ता यांच्या नेटफ्लिक्स शो 'मसाबा-मसाबा'चा सेट तयार केला होता. कोलकाता येथील रहिवासी असलेल्या अनसूयाने जाधवपूर विद्यापीठातून (कोलकाता) शिक्षण घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanmay Dhanania (@tanmaydhanania)

अनुसयाचा चित्रपट -

‘द शेमलेस’ हा भारतीय कलाकारांचा चित्रपट आहे, जो कान्ससाठी निवडला गेला होता. यावेळी 10 हून अधिक भारतीय कलाकारांचे चित्रपट 'कान्स 2024' मध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी गेले आहेत. ‘द शेमलेस’ या चित्रपटाला कान्स येथील यूएन सरटेन रिगार्ड विभागात नामांकन मिळाले होते. या चित्रपटाची कथा भारतातील दोन महिलांभोवती फिरते. हा चित्रपट दोन भारतीय महिलांची कथा आहे ज्या त्यांच्या परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.