
Operation Khukri: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) सध्या त्याच्या 'जात' या नवीन चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता तो आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट देशभक्तीवर आधारीत आहे. त्याने 'ऑपरेशन खुकरी' या सैन्यावर आधारित पुस्तकाचे चित्रपट हक्क विकत घेतले आहेत. लवकरच तो या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची तयारी केरल. व्हरायटी डॉट कॉमच्या वृत्तानुसार, रणदीप हुड्डाने 'ऑपरेशन खुकरी: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द इंडियन आर्मीज ब्रेव्हेस्ट पीसकीपिंग मिशन अब्रोड' या पुस्तकावर आधारित चित्रपट बनवण्याचे अधिकृत अधिकार मिळवले आहेत.
हे पुस्तक मेजर जनरल राजपाल पुनिया आणि दामिनी पुनिया यांनी लिहिले आहे. लवकरच तो या सत्य घटनेवर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीला लागेल. 'ऑपरेशन खुकरी' हा चित्रपट 2000 मध्ये घडलेल्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारीत आहे. Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
आताच्या पश्चिम आफ्रिकेतील देश असलेल्या सिएरा लिओनमध्ये ओलीस ठेवलेल्या 233 भारतीय सैनिकांची आणि त्यांना वाचवण्यासाठी राबवण्यात आलेल्या धोकादायक आणि साहसी मोहीमेची ही कहाणी आहे. त्या कठीण परिस्थितीत मेजर जनरल राजपाल पुनिया यांनी आपल्या सैनिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या या धाडसावर हे पुस्तक आधारीत आहे.