
Kapkapiii Trailer Out: अभिनेता श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना हसवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी 'कपकपी' (Kapkapi) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये हॉरर आणि कॉमे़डीचे जबरदस्त मिश्रण दिसून येते. जे प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देईल. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)शेवटचा कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. परंतु ओटीटीवर प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता तो तुषार कपूर (tusshar kapoor)सोबत 'कपकपी' चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे, ज्याची कथा भुताच्या घटनांभोवती फिरते परंतु हलक्याफुलक्या विनोदी शैलीत.
ट्रेलरमध्ये, दोन्ही कलाकार भीती आणि विनोद यांच्यात ताळमेळ राखताना दिसत आहेत. या दृश्यांमध्ये एक भयानक हवेली, विचित्र घटना आणि काही मनोरंजक पंचलाईन्स आहेत. ज्या चित्रपटाचा सूर स्पष्टपणे प्रतिबिंबित करतात. हा चित्रपट मनोरंजनात्मक शैलीत दिग्दर्शित करण्यात आला आहे, ज्यामुळे तो एक कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट वाटतो.
'कापकपी'चा ट्रेलर पहा:
'कपकपी' 23 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. आता 'कपकपी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हॉरर-कॉमेडी शैलीला नवीन उंचीवर नेऊ शकेल की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल. सध्या, ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढवली आहे.