
Dadasaheb Phalke Biopic: "भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक," दादासाहेब फाळके,(Dadasaheb Phalke Biopic) यांच्यावर बायोपिक बनवण्यात येत आहे. बॉलीवूड स्टार आमिर खान (Aamir Khan) आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दोघे या चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. 3 इडियट्स आणि पीके नंतर, ही जोडी आता पुन्हा एका मोठ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुन्हा एकत्र येत आहे. आमिर खान त्याच्या "सितारे जमीन पर" या पुढील चित्रपटाच्या प्रदर्शनात व्यस्त आहे. ते पार पडताच आमिर खान त्याच्या भूमिकेसाठी तयारी सुरू करेल. हा बायोपिक फाळके यांचा एक कलाकाराच्या प्रवासाचे अनुसरण करेल. जो भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या स्वदेशी चित्रपट उद्योगाचा पाया रचला आणि त्यानंतरचा संपूर्ण प्रवास दर्शवेल.
राजकुमार हिरानी, अभिजात जोशी आणि लेखक हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कर भारद्वाज हे चार वर्षांहून अधिक काळ या प्रकल्पावर काम करत आहेत. दादासाहेब फाळके यांनी सर्व अडथळ्यांना आणि देशातील तेव्हाच्या परिस्थितीला न जुमानता कशी अकल्पनीय कामगिरी केली हे या चित्रपटात दाखवले जाईल.
आमिर खान आणि राजकुमार हिरानी त्यांच्या पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे चित्रीकरण ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू करणार आहेत. 20 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या 'सीतारे जमीन पर' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लवकरच हे चित्रीकरण सुरू होईल. आमिर ज्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखले जाते तो लगेचच प्री-प्रॉडक्शनमध्ये उतरेल अशी अपेक्षा आहे.