Cop Sits Half-Naked Outside Police Station in Unnao: उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील अचलगंज पोलीस स्टेशनच्या चौकीच्या इन्चार्जचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून या इन्स्पेक्टरला सामाजिक लज्जा आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अनेक महिला एका मंदिराच्या ठिकाणी जमल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी काही धार्मिक विधी होत असल्याचे दिसत आहे. अशात त्याच ठिकाणी या महिलांपासून काही अंतरावर एक इन्स्पेक्टर जवळपास नग्न अवस्थेत दिसत आहे. इन्स्पेक्टर आपल्या चौकीच्या बाहेर फक्त अंडरवेअर परिधान करून बसला आहे. या चौकीच्या समोर एक मंदिर आहे, जिथे महिला भजन-कीर्तन करत आहेत. या महिलांसमोर एक सरकारी कर्मचारी ज्या प्रकारे अर्धनग्न स्थितीमध्ये बसला आहे हे दृश्य अतिशय धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या समोर एका इन्स्पेक्टरच्या या कृत्यावर कडाडून टीका होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन उन्नाव पोलिसांनी X वर सांगितले की, बिघापूरच्या क्षेत्र अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Udupi Fight Video: उडुपीमध्ये भररस्त्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, कारने चिरडण्याचा प्रयत्न)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)