Udupi Fight Video: उडुपीमध्ये भररस्त्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, कारने चिरडण्याचा प्रयत्न (Watch Video)

सोशल मीडियावर मारामारीचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात X च्या अकाउंटवरून उडुपी येथील मारामारीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कारच्या विक्रीवरून दोन गटांमध्ये मारामारी झाली आहे.

व्हायरल Pooja Chavan|
Udupi Fight Video: उडुपीमध्ये भररस्त्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, कारने चिरडण्याचा प्रयत्न (Watch Video)
Udupi Viral Fighting video PC TWITTER

Udupi Fight Video:  सोशल मीडियावर मारामारीचे असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात  X च्या अकाउंटवरून उडुपी येथील मारामारीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. कारच्या विक्रीवरून दोन गटांमध्ये मारामारी झाली आहे. दोन्ही गटातील लोक हिंसक पध्दतीने एकमेंकावर हल्ला करताना दिसत आहे. तर काही जण लोकांना कारने चिरडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. भररस्त्यात दोन्ही गट एकमेंकाना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा- हैदराबाद येथील रामेश्वरम कॅफेमध्ये अन्न सुरक्षेचे उल्लंघन)

मिळालेल्या माहितीनुसार, कारच्या विक्रीदरम्यान हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. उडुपी-मणिपाल महामार्गावरील कुंजीबेट्टूजवळ १८ मे रोजी ही घटना घडली. व्हिडिओ व्हायरल होताच,  पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे,  दोन्ही गटातील लोक एकमेकांना बेदम मारहाण करत आहेत. एकमेकांना लाथा मारत आहेत. एवढं नाही तर एकमेकांना कराने चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.

कारच्या गैरवापर करण्याच्या वादातून हे भांडण झाले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, पोलिसांनी दोन्ही गटातील लोकांवर कारवाई सुरु केली आहे. व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून पुढील कारवाई करण्यात येत आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel