Cop Sits Half-Naked Outside Police Station in Unnao: धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांसमोर चक्क 'अंडरवेअर'वर बसला पोलीस; व्हिडिओ व्हायरल, चौकशीचे आदेश (Watch)
इन्स्पेक्टर आपल्या चौकीच्या बाहेर फक्त अंडरवेअर परिधान करून बसला आहे. या चौकीच्या समोर एक मंदिर आहे, जिथे महिला भजन-कीर्तन करत आहेत.
- Read in
- मराठी
Cop Sits Half-Naked Outside Police Station in Unnao: उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील अचलगंज पोलीस स्टेशनच्या चौकीच्या इन्चार्जचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून या इन्स्पेक्टरला सामाजिक लज्जा आहे की नाही?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अनेक महिला एका मंदिराच्या ठिकाणी जमल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी काही धार्मिक विधी होत असल्याचे दिसत आहे. अशात त्याच ठिकाणी या महिलांपासून काही अंतरावर एक इन्स्पेक्टर जवळपास नग्न अवस्थेत दिसत आहे. इन्स्पेक्टर आपल्या चौकीच्या बाहेर फक्त अंडरवेअर परिधान करून बसला आहे. या चौकीच्या समोर एक मंदिर आहे, जिथे महिला भजन-कीर्तन करत आहेत. या महिलांसमोर एक सरकारी कर्मचारी ज्या प्रकारे अर्धनग्न स्थितीमध्ये बसला आहे हे दृश्य अतिशय धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या समोर एका इन्स्पेक्टरच्या या कृत्यावर कडाडून टीका होत आहे. या प्रकरणाची दखल घेऊन उन्नाव पोलिसांनी X वर सांगितले की, बिघापूरच्या क्षेत्र अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (हेही वाचा: Udupi Fight Video: उडुपीमध्ये भररस्त्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, कारने चिरडण्याचा प्रयत्न)
पहा व्हिडिओ-
विडियो शनिवार का है। उन्नाव के अचलगंज में एक मंदिर में आयोजन चल रहा था, तभी वहां बनी पुलिस चौकी में दरोगा किस हाल में बैठा है, ये खुद देखिए। #Unnao #UPPolice @NBTLucknow pic.twitter.com/dYeYGfscXA
— Praveen Mohta (@MohtaPraveenn) May 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

