Munjya Movie Trailer: अंगाला काटा आणणारा 'मुंज्या' सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी चित्रपट होईल रिलीज
बहुप्रतिक्षित बॉलिवूडचा 'मुंज्या' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला होता.
Munjya Movie Trailer: बहुप्रतिक्षित बॉलिवूडचा 'मुंज्या' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. धमाकेदार ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला होता. टीझर आणि ट्रेलर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. ट्रेलरमध्ये मुंज्या आणि मुन्नीचं रिलेशन दाखवले आहे. चित्रपटात अधुरी प्रेमकहाणी दाखवली आहे. तेच पाहण्याची प्रेक्षकांनी सिनेमासाठी उत्सुकता दाखवली आहे. चित्रपटात मराठी कलाकार झळकणार आहे. चित्रपटात शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय मोना सिंह, अभय वर्मा आणि सत्यराज सिंह दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सातपोतदार आहेत. येत्या महिन्यात ७ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (हेही वाचा- 'कल्की 2898 एडी' या आगामी साय-फाय चित्रपटात बुज्जी बनला प्रभासचा चांगला मित्र, अप्रतिम व्हिडिओ रिलीज )
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 26, 2024 02:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

