देशातील आघाडीची स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) उत्पादक कंपनी महिंद्राची नवीन SUV आज लाँच झाली आहे. महिंद्राने आज Mahindra XUV 3XO चे जागतिक पदार्पण केले आहे. त्याची किंमत ₹7.49 लाख पासून सुरू होते आणि त्यात अपडेट केलेले डिझाइन, वैशिष्ट्ये आणि सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. या एसयूव्हीमध्ये अशी काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी त्याच्या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच दिली जात आहेत. या गाड्यांची बुकींग सुरु होताच 1 तासाच्या आत तब्बल 50 हजार गाड्या बुक झाल्या आहेत. आनंद महिंद्रा यांनी याबाबतचे ट्विटकरुन माहिती देत ग्राहकांचे आभार मानले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)