Indigo Flight Drunk Passenger Arrest: 25000 फूट उंची, 200 हून अधिक प्रवासी; विमानातील प्रवाशाच्या 'या' भयानक कृत्याने उडाली खळबळ
Flight | Representational image (Photo Credits: pxhere)

Indigo Flight Drunk Passenger Arrest: विमान सुमारे 25 हजार फूट उंचीवर होते आणि 200 हून अधिक प्रवासी इंदूरहून हैदराबादला जात असताना अचानक एका प्रवाशाच्या कृत्याने सर्वांचा जीव धोक्यात घातला. त्याची ही कृती पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्याला पकडण्यात आले आणि खुर्चीवर बसवण्यात आले. तसेच त्याचे हात पाय बांधण्यात आले. विमानातून उतरताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, परंतु त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण, त्याच्या वैद्यकीय अहवालात त्याला आरोग्य समस्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवासी गांजाच्या प्रभावाखाली असल्याने एवढ्या उंचीवर विमानाचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला. प्रवासी आणि क्रू मेंबर्सने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने गेट उघडले आणि उडी मारण्याची धमकी देऊ लागला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदोर, मध्य प्रदेश येथून इंडिगोचे विमान 21 मे रोजी हैदराबादसाठी उड्डाण केले. चंद्रगिरी नगर, गजुलारामराम, हैदराबाद येथील रहिवासी असलेला 29 वर्षीय प्रवासी देखील विमानात होता, परंतु त्याने विमानतळात गांजाचे सेवन केल्याचे तपासात उघड झाले. प्रवासादरम्यान त्याला नशा चढली आणि तो विचित्र गोष्टी करू लागला. (हेही वाचा - Uttar Pradesh Shocker: जीवे मारण्याच्या प्रयत्नातून तरुणाला इमारतीच्या टेरेसवरून फेकले, घटनेचा Video व्हायरल)

दरम्यान, त्याने विमानाचा दरवाजा हवेत उघडण्याचा प्रयत्न केला. हे पाहून प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. त्या व्यक्तीचे असामान्य आणि विचित्र वागणे पाहून, क्रू मेंबर्सनी त्याला दुसऱ्या सीटवर बसवले, परंतु त्याने त्याच्या दोन मित्रांजवळ बसण्याचा आग्रह धरला. ज्यांच्यासोबत तो मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालच्या दर्शनासाठी गेला होता. क्रू मेंबर्सनी त्याला त्याच्या मित्रांसोबत बसायला लावलं, पण जेव्हा फ्लाइट लँडिंग सुरू झालं तेव्हा त्याने दरवाजा उघडायला सुरुवात केली.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरताच विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला अटक केली, मात्र त्याच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याला जामीन मंजूर करण्यात आला. यापुढे कोणताही प्रवासी मद्यधुंद अवस्थेत प्रवास करू शकणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे एअरलाइन्स अधिकाऱ्यांनी सांगितले.

तथापी, 10 एप्रिल रोजीही एका प्रवाशाने हैदराबादहून कोलकात्याला जाणाऱ्या फ्लाइटचे इमर्जन्सी गेट उघडण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील दारूच्या नशेत होता. अबुजर मंडल असं या प्रवाशाचं नाव होतं. त्याला अटक करण्यात आली होती, परंतु त्याला जामीनही मिळाला होता.