US Horror : पाश्चिमात्य देश जसे विकसीत आहेत. तसे तिथल्या खाद्य संस्कृतीही वेगळ्या आहेत. कोक, वाईन, बर्गर, पिझ्झा, न्यूड्स, स्पगेटी, असे वेगवेगळे फास्टफूड- ड्रींग्स (Soda Diet)तेथे लहानग्यांपासून मोठी माणसे सर्रास खाताना आढळतात. मात्र, त्यामुळे अमेरिकेत (Us Girl)एका 4 वर्षाच्या मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे. कर्मिटी होएब असे मृत मुलीचे नाव आहे. तिला लहान असल्यापासून मधुमेहाचा(Diabetes) आजार होता. ते माहित असूनही तिची आई तमारा बँक्स हिने तिला माउंटन ड्यू पिण्यास देत होती. किंबहून घरता त्याचा एक बॉक्सच आणून ठेवला होता. जानेवारी 2022 मध्ये कर्मिटी होएब या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वैद्याकिय अहवालात तिचे दातही किडल्याचे आढळून आले होते. ज्यात स्पष्ट लिहीले होते की, त्यासाठी तिच्यावर कधीच कोणतेही वैद्यकीय उपचारही झाले नव्हते.
निष्काळजी मातेला शुक्रवारी ९ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याशिवाय, तिने अनेकदा मुलीला निऑन-ग्रीन शर्करायुक्त सोडा पिण्यासाठी दिला होता. माउंटन ड्यूमध्ये विशेषत: 77 ग्रॅम साखर असते, जी लहान मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. लहान मुलीचे वडील, क्रिस्टोफर होएब, 53, यांनी देखील अनैच्छिक मनुष्यवधाचा गुन्हा कबूल केला आहे.
जानेवारी 2022 मध्ये कर्मिटी हिला जेव्हा गंभीर वैद्यकीय समस्या जाणून लागल्या तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते. दिवस जसजसे वाढत गेले तसतशी तिची लक्षणे आणखीनच वाढत होती. तेव्हा ती अचानक बेशुद्ध झाली. तिच्या चेहऱ्याचा रंग निळसर झाला होता. श्वासोच्छवास थांबला होता. तेव्हा तिच्या आईने 911 वर कॉल केला, असे सिनसिनाटी इन्क्वायररने नोंदवले.
तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी तिला स्कॅन केले. त्यावेळी तिचा मेंदू मृत झाल्याचे दिसून आले. शवविच्छेदनात असे दिसून आले की तिचा मृत्यू मधुमेह-संबंधित मेंदूच्या दुखापतीमुळे झाला. मृत्यू्चया आधी तिला साखरयुक्त पेय दिले गेले होते. असे अहवालातून समोर आले. तिला कधीही दंतवैद्याकडे नेण्यात आले नाही, असेही अहवालात म्हटले होते.
NEW: Cincinnati parents Christopher Hoeb and Tamara Banks plead guilty to involuntary manslaughter of their 4 year old daughter.
The child was almost exclusively fed Mountain Dew. They went as far as to mix it in with baby formula.
The parents were originally indicted with… pic.twitter.com/CbaamYxzI6
— Joshua Walker (@RedsRepair95) April 28, 2024
"चांगले पालक बनणे कठीण आहे, परंतु तुम्ही किमान मध्यम पालकांची अपेक्षा तरी करू शकतो, प्रत्येकाने तशी अपेक्षा केली पाहिजे. काय करावे हे माहित नसणे हा दोष आहे, असे न्यायाधीशांनी शुक्रवारी सुनावणीदरम्यान म्हटले.