Elon Musk Accuses WhatsApp: जर तुम्हीही व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. एलॉन मस्क यांनी जगातील सर्वात मोठ्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर मोठा आरोप केला आहे. एलॉन मस्कच्या या विधानाने तंत्रज्ञान जगतात खळबळ उडाली आहे. एलॉन मस्क यांनी व्हॉट्सॲपवर डेटा भंगाचे गंभीर आरोप केले आहेत. एलॉन मस्क यांनी मेटा-मालकीच्या व्हॉट्सॲपबाबत सांगितले आहे की, दररोज रात्री व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा एक्स्पोर्ट करते. मस्कच्या या वक्तव्यामुळे लाखो व्हॉट्सॲप यूजर्स चिंतेत पडले आहेत.

एलॉन मस्क यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे की, 'व्हॉट्सॲप प्रत्येक रात्री तुमचा यूजर डेटा एक्सपोर्ट करते, मात्र अजूनही काही लोकांना वाटते की गोपनीयतेच्या दृष्टीने आणि सुरक्षिततेच्या बाबतीत व्हॉट्सॲप पूर्णपणे सुरक्षित आहे.’ मस्कच्या या आरोपामुळे पुन्हा एकदा व्हॉट्सॲपवरील युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. एलॉन मस्क यांनी सांगितले की, चोरीचा डेटा लक्ष्यित जाहिरातींसाठी वापरला जातो. एलॉन मस्कच्या या आरोपावर आतापर्यंत मेटा किंवा व्हॉट्सॲपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. (हेही वाचा: CERT-In Alert for Google Chrome Users: गूगल क्रोम वापरकर्त्यांनो सावधान! भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीमचा इशारा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)