SRH vs KKR IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा अंतिम सामना (IPL 2024 Final) 26 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जाईल. या हंगामात दोन्ही संघांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मोसमात श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरने संघाने पहिल्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादला पराभूत करून थेट अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले होते, तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत फायनलमध्ये जागा परत केली. आता दोन्ही संघांच्या नजरा जेतेपदावर आहेत.
Two Captains. One Trophy 🏆
..And an eventful Chennai evening 🛺🏖️
All eyes on the #Final 😎#TATAIPL | #KKRvSRH | #TheFinalCall pic.twitter.com/5i0nfuWTGN
— IndianPremierLeague (@IPL) May 25, 2024
कोणाचं पारडं आहे जड?
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद एकूण 27 वेळा आमनेसामने आले आहेत. या कालावधीत केकेआरने 18 वेळा, तर हेदराबादने 9 वेळा विजय मिळवला आहे. केकेआरविरुद्ध हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या 228 धावा आहे तर हैदराबादविरुद्ध केकेआरची सर्वोत्तम धावसंख्या 208 धावा आहे. (हे देखील वाचा: SRH vs KKR IPL 2024 Final Live Streaming: फायनलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने, एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह स्ट्रीमिंग)
एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघांची कशी आहे आकडेवारी?
अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने 14 सामने खेळले आहेत. या कालावधीत कोलकाता नाईट रायडर्सने फक्त 4 सामने जिंकले आहेत आणि 10 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथे कोलकाता नाईट रायडर्स संघाची सर्वोत्तम धावसंख्या 202 धावा आहे. या मैदानावर सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. या कालावधीत सनरायझर्स हैदराबादने 2 सामने जिंकले आहेत आणि 8 गमावले आहेत. तर 1 सामना बरोबरीत आहे. या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद संघाची सर्वोत्तम धावसंख्या 177 धावांची आहे.