SRH vs KKR IPL 2024 Final: आयपीएल 2024 चा अंतिम सामना (IPL 2024 Final) रविवार, 26 मे रोजी म्हणजे आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) खेळला जाणारा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. विजेतेपद मिळवण्यासाठी दोन्ही संघांना आपापल्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरायचे आहे. या सामन्याद्वारे केकेआर तिसरे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल आणि हैदराबाद दुसरे जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, अंतिम फेरीत विजयी होणाऱ्या संघाला ट्रॉफीसह कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. या वर्षी विजेत्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाईल तसेच, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला किती पैसे मिळतील या लेखातून आपण माहिती घेवू.
विजेता संघावर होणार पैशाचा वर्षाव
आयपीएल 2024 च्या विजेत्या संघाला केवळ चमकदार ट्रॉफी मिळणार नाही तर बक्षीस म्हणून मोठी रक्कम देखील मिळेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2024 च्या चॅम्पियन टीमला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संघांनाही करोडो रुपये मिळणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 7 कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील. यानुसार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 6.5 कोटी रुपये मिळतील. कारण त्यांचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
Can #KKR's spin twins thwart #SRH's dynamic duo? 🤔💭
Tell us using #IPLonJioCinema & don't miss watching the LIVE action of the #TATAIPL Final, tonight from 6 PM, streaming FREE on #JioCinema 📲#KKRvSRH #IPLFinal #IPLonJioCinema pic.twitter.com/EhDg0nedgP
— JioCinema (@JioCinema) May 26, 2024
हे देखील वाचा: SRH vs KKR Head To Head: कोलकाता-हैदराबादमध्ये किती वेळा झाली लढत? कोणाचं पारडं जड जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड
ऑरेंज अन् पर्पल कॅप मिळवणारे खेळाडूही होतील मालामाल
आयपीएलमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळालेल्या बक्षीस रकमेशिवाय इतरही अनेक पुरस्कार दिले जातात. यामध्ये ऑरेंज कॅप, पर्पल कॅप या पुरस्कारांचा समावेश आहे. आम्ही तुम्हाला या सर्व पुरस्कारांबद्दल आणि त्यांच्याशी संबंधित बक्षीस रकमेबद्दल सांगत आहोत. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप पुरस्कार दिला जातो. ऑरेंज कॅप विजेत्याला 15 लाख रुपये दिले जातील. ऑरेंज कॅप जिंकण्याच्या शर्यतीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यावेळी 15 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, इमर्जिंग खेळाडूला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. हर्षल पटेल पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे.