दृष्टीहीन व्यक्तींना नोटा ओळखण्यासाठी RBI कडून 'MANI' अ‍ॅप लॉन्च
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

भारतीय रिझर्व्ह बँक कडून दृष्टीहीन व्यक्तींना मदतीचा हात पुढे करत त्यांच्यासाठी एक नवे मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. MANI असे या अॅपचे नाव असून दृष्टीहीन व्यक्तींना नोटा ओळखण्यास मदत होणार आहे. देशात जवळजवळ 80 लाख नेत्रहीन व्यक्ती आहेत. मात्र आरबीआयकडून लॉन्च करण्यात आलेल्या अॅपच्या माध्यमातून त्यांना नोटा ओळखणे सोईस्कर ठरणार आहे. सध्या बाजारात 10,20,50100,200,500 आणि 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत. नोटा ओळखण्यासाठी 'इंटाग्लियो प्रिंटिंग' आधारित ओळख चिन्ह देण्यात आले आहेत. मात्र हे चिन्ह 100 रुपयांच्या नोटांसाठी दिले आहेत.

केंद्रीय बँककडून असे सांगण्यात आले आहे की, दृष्टीहीन व्यक्तींना या अॅपच्या माध्यमातून कितीची नोट असणार आहे हे समजणार आहे. तसेच मनी अॅप हे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काम करणार आहे. हे अॅप डाऊनलोड अॅन्ड्रॉइड आणि आयओएस या स्मार्टफोनमध्ये होणार आहे. तसेच मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून नोट स्कॅन केल्यानंतर तुम्हाला ती कितीची नोट आहे ते सांगण्यात येणार आहे. त्याचसोबत हिंदी आणि इंग्रजी भाषेतून नोटबाबत माहिती देण्यात येणार आहे.(RBI Alert: चुकूनही डाऊनलोड करु नका हे App , काही सेकंदातच तुमचे Bank Account होईल रिकामे)

आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी हे अॅप लॉन्च केले आहे. त्यावेळी आरबीआयचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.